शुक्रवार, 7 जून 2024

जांभळीचा बांगला (बालकथासंग्रह)

जांभळीचा बंगला ; छान गोष्टींचा संग्रह

लहान मुलांना गोष्टी ऐकायला वाचायला खूप आवडतात. कारण गोष्टीतील घटनाक्रम त्यांनी कधीही न ऐकलेला असतो. त्यामुळे त्यांना पुढे काय होणार याची जिज्ञासा असते. म्हणून ते प्रत्येक गोष्ट मन लावून वाचतात व ऐकतात. त्यातून त्यांची कल्पनाशक्ती विकसित होत असते. मनोमन गोष्टीतील शेवटाविषयी अदांज बांधत ते त्यात रममाण होऊन जातात. लहान मुलांना असाच हलक्याफुलक्या छान छान गोष्टीत रममाण करणारा लेखिका वैशाली सूर्यवंशी यांचा ‘जांभळीचा बंगला’ बालकथासंग्रह आहे.  

लेखिका वैशाली सूर्यवंशी या प्राथमिक शिक्षिका आहे. बालविश्वात वावरताना त्यांना मुलांच्या आवडीनिवडीविषयी बारकाईने अभ्यास आहे. त्या अभ्यासातूनच त्या लहान मुलांसाठी सतत लेखन करत असतात. डॅनीच्या मिश्या आणि इतर गोष्टी व जांभळीचा बंगला असे दोन बालकथासंग्रह त्यांचे प्रकाशित आहेत. नकळत त्यांच्या आतले कोवळेपण उमलत लहान होते व साधेसाधे विषय त्यांच्या गोष्टीचे विषय बनत मुलांवर संवेदनशीलतेचे संस्कार करून जातात. 

‘जांभळीचा बंगला’ बालकथासंग्रहात एकूण आठ कथा आहेत. पहिली कथा ‘हरण्या’ आहेत. त्यात दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे शेतकरी आईवडील तुफान्या, वादळ्या, हरण्या ही आवडती जनावरे विकायचा निर्णय घेतात. मुलगा कार्तिक या निर्णयामुळे खूप कष्टी होतो. अशी ही प्राणीमात्राविषयी गोडी निर्माण करणारी कथा वाचून लहान मुलांनाही प्राण्यांविषयी लळा लागल्याशिवाय राहणार नाही. 

पुढची शीर्षककथा आहे, ‘जांभळीचा बंगला’.  ही साहसकथा आहे. या कथेत एक जांभळीचा बंगला आहे. त्या बंगल्यात भूत आहे म्हणून कोणीही त्या बंगल्यात जाण्याचं किंवा भोवती फिरकण्याचं धाडस करत नाही. भिवा आणि त्याचे मित्र आंबे पाडायचे म्हणून जांभळीच्या बंगल्याजवळ जातात, पुढे त्या मुलांचं काय होतं हे लेखिकेच्या शब्दात वाचणेच धारिष्ट्याचे ठरेल.  

तिसरी ‘लिली’ नावाची कथा आहे, दिव्यांग मुलांची धावण्याची स्पर्धा असते. लिलीने धावण्याची खूप तयारी केलेली असते. ती धावण्यात एक नंबर येऊन स्पर्धा जिंकते की ; स्पर्धा हरून माणसांची मने जिंकते हे कथा वाचल्यावरच कळणार आहे.  

दगड आणि बुलबुल, मैनूफुलपाखरू, मनूचा फुटबॉल, एका भांडणाची गंमत, सोनेरी बूट अशा लहान मुलांना आवडीच्या विविध विषयावरील आठ कथा आहे. लेखिकेने कुठलेही प्रयोगात्मक कलाटणी तंत्र कथेसाठी वापरलेले नाही. त्यांनी लहान मुलांच्या आकलन शक्तीचा विचार करत साधी सोपी कथा लिहिली आहे. जी लहान मुलांना झेपणारी आहे, साधं सोपं लिहिणं खरोखर सोपं काम नसतं. ते काम लेखिका वैशाली सूर्यवंशी लीलया पेललेले आहे. कथासंग्रहाला विजया वाड यांची छोटी पण मार्मिक प्रस्तावना आहे. कथासंग्रह दिलीपराज प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहे. आतील मांडणी आणि कव्हर संतुक गोलेगावकर यांनी छान सजवले आहे,  एकूणच कथासंग्रह छान झालेला आहे, लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी वाचावासा आहे, लेखिका वैशाली सूर्यवंशी यांच्या ‘जांभळीच्या बंगला’ कथासंग्रहास व पुढील लेखनास हार्दिक शुभेच्छा. 

आस्वादक 
लेखक संजय द. गोराडे (नाशिक)
मो. नं - ९८५०६९१२१६

माती मागतेय पेनकिलर (कवितासंग्रह)

' माती मागतेय पेनकिलर ': समकालीन शेतीसंस्कृतीच्या विदारक वास्तवाचा आरसा ​ कवी: सागर जाधव जोपुळकर पाठराखण : पी. विठ...